पंकजा मुंडेंनी घेतलं शनीचं दर्शन
शनीशिंगणपूरमध्ये शनीच्या चौथऱ्यावर महिला प्रवेशावरून सध्या महाराष्ट्रामध्ये वाद सुरु आहे.
बीड: शनीशिंगणपूरमध्ये शनीच्या चौथऱ्यावर महिला प्रवेशावरून सध्या महाराष्ट्रामध्ये वाद सुरु आहे. पण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पाथर्डीमधल्या शनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी शनीला तेलही वाहिलं.
धार्मिक स्थळांमध्ये प्रवेशाबाबत महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव होऊ नये, असा निकाल उच्च न्यायालयानं दिला. त्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी शनीशिंगणापूरच्या मंदिरामध्ये प्रवेश करायचा प्रयत्नही केला.
यावरुन शनीशिंगणापूरमध्ये सध्या वातावरण तापलं आहे. यातच आता पंकजा मुंडेंनी पाथर्डीत शनीचं दर्शन घेतलं. याचा फोटो पंकजा मुंडे यांनी ट्विट केला आहे. शनीशिंगणपूरप्रमाणे पाथर्डीच्या या मंदिरामध्ये महिला प्रवेशला बंदी नव्हती.