नवी मुंबई : शॉपिंगसाठी आलेल्या दाम्पत्याला नवीमुंबईत स्थानिक गुंडांनी बेदम मारलं आहे. माणगाव येथून दिनेश नाईक आणि इशा नाईक आपल्या मुलीसह पनवेलला आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे कुटुंब विजय सेल्स येथे खरेदी करण्यासाठी गेल्यावर एका मोटारसायकल स्वारानं त्यांच्या गाडीला कट मारली. यातून झालेल्या वादात मोटारसायकस्वार आणि त्याच्या साथीदारांनी या दांम्पत्याला बेदम मारहाण केली.


 पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.. यातील एका तरुणाला पकडण्यात पोलिसांना यश आलं मात्र तो पोलिसांनाही शिविगाळ करीत असल्यानं पोलिसांनी त्याला पोलीसी खाक्या दाखवला.