पिंपरी चिंचवड : निवडणूक म्हटलं की राजकीय पुढाऱ्यांच्या कोलांटउड्या ओघानं आल्याच. आयुष्यभर एका पक्षाशी निष्ठा दाखवत पद उपभोगायची पण ऐन निवडणुकीत तिकीट डावललं किंवा मनासारखं झालं नाही की दुसऱ्या पक्षात जायचं ही नेत्यांची 'चाल' जनतेला नवी नाही. पण नेत्यांच्या या कोलांटउड्यात जो कार्यकर्ता पक्षाकडून कसलीही अपेक्षा न बाळगता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतो आणि एका पक्षाशी निष्ठा दाखवतो त्याच्या पदरी मात्र निराशाच येते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निष्ठेनं काम करणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या राजकीय कार्यकर्त्यांच्या मनात सध्या याच भावना असतील. राजकीय नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या असतात. त्या राबवण्यासाठी कार्यकर्ते नेते मंडळी या पक्षातून त्या पक्षात कोलांटउड्या मारतात. पण कार्यकर्त्यांचं काय ?..


गेली 20 ते 25 वर्षे काँग्रेसमध्ये असलेल्या भाऊसाहेब भोईर यांनी त्यांच्या 6 समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. ज्या आझम पानसरे यांनी आरएसएस, भाजपवर टीका केली त्यांनीही राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. पण पक्षासाठी झोकून देऊन काम करणा-या कार्यकर्त्यांची साधी दखलही या नेतेमंडळींनी घेतली नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला राजकीय पक्षात काही ना काही मिळतच असं नाही, पण केवळ विशिष्ट विचारधारेनं, विशिष्ट भावनेनं कार्यकर्ते पक्षाचं काम करतात. पण वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपुढे सर्वच पक्षातले नेते कोलांटउड्या मारायला लागले की कार्यकर्ते हवालदिल होतात


निवडणुकीच्या रणसंग्रामात विजय महत्वाचा आहेच…पण त्या साठी विचारधारा, पक्षनिष्ठा पणाला लावण खरंच किती गरजेचं आहे याचा विचारही अपेक्षित आहे. अर्थात विजयासाठी जिथ उमेदवार साम दाम दंड भेद आणि नीती या सगळ्यांचा अवलंब करतो तो नैतिकता पळेल हे मानण ही मूर्खपणाचे ठरेल.