कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात चक्क दारूची पार्टी सुरु असल्याचा प्रकार समोर येतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा प्रकार सोमवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ग-प्रभाग अंतर्गत येणाऱ्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील फेरीवाला हटाव पथकातील तीन ते चार कर्मचा-यांची रात्री ९ च्या सुमारास जोरदार दारु पार्टी सुरु होती. या पार्टीची कुणकुण लागताच बाजूलाच असणाऱ्या पत्रकार कक्षातील काही पत्रकारांनी तिथं जाऊन खातरजमा केली.


पत्रकारांनी घटनास्थळी पाहणी केली असता तळ मजल्यावर असलेल्या भांडार गृहातून या कर्मचाऱ्यांनी बाहेर पळ काढला. या ठिकाणी दारूच्या बाटल्या, सिगरेटची पाकिटं, दारूने भरलेले ग्लास, भाजलेल्या चण्यांचा चकणा आदी साहित्य आढळून आलंय. मात्र दारु पार्टी करणाऱ्या या कर्मचाऱ्यांची नावं अद्याप समजू शकली नाहीत.