भुजबळांच्या अटकेवर पवारांचं धक्कादायक वक्तव्य
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांना अटक झाली आहे. पण त्यांच्या अटकेविषयी पवारांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
सातारा: महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांना अटक झाली आहे. पण त्यांच्या अटकेविषयी पवारांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
छगन भुजबळांनी चूक असेल तर त्यांनी त्याची किंमत मोजीव लागेल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. पवारांच्या या वक्तव्यामुळे भुजबळांना राष्ट्रवादी काँग्रेसनं वा-यावर सोडलंय का असा सवाल उपस्थित होतोय.
भुजबळांची चौकशी सुरू आहे. त्यामुळं कुणी त्यांच्याविरोधात मुद्याम केलं असेल तर कोर्टात समोर येईलच अशी पुष्टीही पवारांनी जोडली आहे. काही ठिकाणी सत्तेचा गैरवापर होतोय असा आरोपही पवारांनी सरकारवर केलाय.