रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील वायंगणे गावातल्या महिलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आलीय. गावात नळपाणी योजना झाली खरी पण नळाला काही पाणी आलेलं नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून याबाबत दोषींवर कारवाई व्हावी यासाठी इथले सरपंच आणि ग्रामस्थ प्रशासनाविरोधात लढा देत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वायंगणे गावात पाणी पुरवठा योजना असूनही अशी दाही दिशा फिरण्याची वेळ इथल्या ग्रामस्थांवर आलीय...36 लाखांच्या योजनेतून 36 दिवसही पाणी आलेलं नाही... निकृष्ट काम, चुकीच्या ठिकाणी केलेली नळपाणी योजना आणि योजनेत झालेला भ्रष्टाचार ही सगळी कारणं त्याला जबाबदार असल्याचा आरोप सरपंचांनी केलाय. 


या योजनेसंदर्भात तत्कालीन सरपचांनी ग्रामस्थांना विश्वासातच घेतलं नव्हतं. गावातल्या बावनदीवरून योजना मंजूर झाली मात्र ती पूर्ण करताना एका ओढ्यावरून योजनेच्या कामाला सुरूवात झाली. पण त्यालाही आता पाच वर्षे होऊन गेली. पण पाणी काही ग्रामस्थांना मिळालेलं नाही.



या योजनेत भ्रष्ट्राचार झाल्याचं लेखा परीक्षण अधिका-यांनी देखील मान्य केले आहे. ग्रामस्थ अनेक वर्षांपासून भ्रष्टाचाऱ्यांवरील कारवाईसाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र तरी देखील दोषींवर कुठलीही कारवाई होत नव्हती. अखेर सरपंचांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर झेडपीच्या सीईओंनी संबंधितांना नोटीस पाठवली आहे.