पिंपरी-चिंचवड : शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेची खिल्ली उडवली. ते पुढे बोलले की, 'मुख्यमंत्री म्हणतात मी सध्या संयुक्त महाराष्ट्राचा आहे. म्हणजे उद्या पद गेले की हे महाराष्ट्राचे तुकडे करायला मोकळे. मराठी ही मातृभाषा असणा-या राज्याचे हे दोन तुकडे करणार आहेत. ज्या राज्याच्या ऐक्यासाठी 109 हुतात्म्यांनी रक्त गाळले. पण तुमच्या नेत्यांत दम नाही, ती कुवत नाही. यांच्या हातून राज्याची जपणूक केली जाणार नाही.'


'महाराष्ट्र एकसंध ठेवणे यांना शक्य नाही. हे नेते नागपूरला जाऊन सांगतात पिंपरी-चिंचवड, रांजणगाव येथे कंपनी आहेत, अरे तुमच्या नेत्यातच दम नाही तर कसे येणार तुमच्याकडे उद्योगधंदे? असा सवालही शरद पवारांनी यावेळी उपस्थित केला.