बुलडाणा : मधमाशांच्या हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातल्या घुईचे ग्रामस्थ जखमी झालेत. घुई गावाजवळच्या मन नदीपात्रालगत असलेल्या लिंबाच्या झाडावर आग्या मोह होते. या पोळ्यावरच्या माशा उडून गावात गेल्या. या माश्यांनी ग्रामस्थांवर हल्ला केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात 40 वर्षीय सतीश भोजने, 35 वर्षीय प्रविण भोजने, 55 वर्षीय धम्म दिना भोजने, आणि 26 वर्षीय राणी अंदुरकर गंभीर जखमी झालेय. आणखी एका जखमीचे नाव समजु शकलेले नाही. 


शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात सर्व जखमींना दाखल करण्यात आलंय. गुरूवारीही याच गावातल्या वछलाबाई तायडेही मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावरही सईबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.