सख्खा मित्र बनला पक्का वैरी!
नाशिक शहरात मित्रानेच मित्राला २३ लाखाला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
नाशिक : नाशिक शहरात मित्रानेच मित्राला २३ लाखाला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
नामांकित फुटवेअर कंपनीची एजन्सी चालवणाऱ्या व्यवसायिकाला बँकेत २५ लाख रुपयांचा भरणा करायचा होता. त्यासाठी त्याने २३ लाख ५० हजार रुपये जमा केले. मात्र, तरीही जवळपास सव्वा लाख रुपयाची रक्कम बाकी होती.
त्यासाठी त्याने आपल्या पार्टनरचा मित्र असणाऱ्या मुकेश जैन याच्याशी संपर्क साधला. त्याने दोघांना पैसे घेण्यासाठी नाशिकच्या होलाराम कॉलनीतील परिमल अपार्टमेंटमध्ये राहत असलेल्या घरी बोलावले.
त्यानुसार व्यवसायिक त्याच्या पार्टनरसह उसने सव्वा लाख रुपये घेण्यासाठी जैनच्या घरी गेले. त्यावेळी त्यांच्याजवळ २३ लाख रुपयाची बॅग होती. यावेळी मुकेशने त्याला गप्पा-गोष्टी चहापाण्यात गुंतवून ठेवत २३ लाख रुपये घेऊन पोबारा केला. याप्रकणी सरकारवाडा पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.