उमेदवारीसाठी शौचालयासोबत फोटो अनिवार्य
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हजारोंच्या संख्येन इच्छुक उमेदवार आहेत.
नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हजारोंच्या संख्येन इच्छुक उमेदवार आहेत. मात्र हे सारे उमेदवार फोटो सेशनमध्ये दंग आहेत. कधी डावी कडून पोज देवून तर कधी उजवीकडून पोज देवून फोटो कसा चांगला येईल, यासाठी उमदेवार आणि त्याच्या सहकार्यांची धडपड सुरु आहे.
उमेदवार म्हटला की त्याच्या छबीची जोरदार चर्चा तर होणार आहे, तशीच चर्चा सध्या नाशकात सुरु आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी उमेदवार आकर्षक वेशभूषा करून पोर्टफोलिओ तयार करीत असतात.
मात्र शौचालयाच्या समोर सुरु असणारे हे फोटो सेशन काही औरच. यंदाच्या निवडणुकीपासूनच प्रथमच प्रत्येक उमेदवाराला शौचालय असल्याचा दाखला घेणं आणि आहे, त्या शौचालया समोर उभे राहून काढलेला फोटो सादर करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र या फोटो विथ टोईलेट विषयी उमेदवारांकडून नाराजी व्यक्त केली जाते आहे.