पिंपरी चिंचवड : महापालिका निवडणुकांमध्ये अनेक उमेदवार काही विक्रम प्रस्थापित करतात. पिंपरी चिंचवडच्या प्रभाग क्रमांक 15 मधले राष्ट्रवादीचे उमेदवार आर एस कुमार असाच विक्रम प्रस्थापित करण्यासाठी तयार आहेत...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलग सहा वेळा नगरसेवक झालेले आर एस कुमार आता सातव्यांदा नशीब आजमावतायेत. गेली 30 वर्षे आर एस कुमार निगडी प्राधिकरण या पिंपरी चिंचवडमधल्या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत. 


आर. एस कुमार यांच्यासोबत त्यांच्या प्रभागातून माजी महापौर राजू मिसाळ, भारती फरांदे, ज्योती भालेराव हे उमेदवार रिंगणात आहेत. त्याच प्रभागात त्यांना कडवं आव्हान असणार आहे ते शिवसेनेच्या पॅनलचं. आर. एस. कुमार यांचा या निवडणुकीत विजय झाला तर पिंपरी चिंचवड महापालिकेत सात वेळा निवडून येण्याचा विक्रम करणारे ते एकमेव नगरसेवक असतील.