पिंपरी चिंचवड : महानगर पालिकेच्या निवडणुकांचा पट सजला असताना प्रचारात अनेक मुद्दे पुढं यायला लागलेत. त्यातला एक प्रमुख मुद्दा म्हणजे अनधिकृत बांधकामाचा. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत हा प्रश्न सुटला नाही त्याची मोठी किंमत राष्ट्रवादीला चुकवावी लागली. आता गेली अडीच वर्ष सत्तेत असूनही भाजपला हा प्रश्न सोडवता आलेला नाही. त्यामुळं हा मुद्दा महापालिका निवडणुकीत गाजणार अशीच चिन्हं आहेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनधिकृत बांधकामं नियमित केली जाणार असं गाजर पिंपरी चिंचवडकरांना या पूर्वी वेळोवेळी देण्यात आलं. आघाडी सरकारही त्यात मागे नव्हतं. 


लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हा प्रश्न सुटला नाही. त्यामुळं महापालिका निवडणुकीत हा मुद्दा प्रमुख ठरणार अशीच चिन्हे आहेत. एकीकडं हा प्रश्न सोडवण्यास अपयश आलेल असताना ही भाजप हा प्रश्न सोडवण्याचा दावा करतेय.


दुसरीकडं राष्ट्रवादीने आम्ही हा प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचं सांगत भाजप यावर राजकारण करत असल्याचा आरोप वारंवार केलाय.


महापालिका निवडणुकांची आचारसंहिता केंव्हा हे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासंबंधी काही निर्णय होईल अशी शक्यता नाही. त्यामुळं आता महापालिका निवडणुकीत हा मुद्दा पुन्हा गाजणार अशीच चिन्ह आहेत.