झोपडपट्टीत राहणारी, पालिका शाळेतली मुलं निघाली `स्वीडन`ला!
पिंपरी चिंचवडमधल्या महानगर पालिकेच्या शाळेत शिकणारी मुलं खर तर खडतर परिस्तितीशी मुकाबला करणारी… वडील रोजंदारीवर काम करणारे... आर्थिक स्थिती बिकट… पण, असं असतानाही पिंपरी चिंचवड मधली काही मुलं आणि मुली थेट स्वीडनला निघालीत. ते ही फुटबॉल खेळायला... स्वीडनमध्ये १७ जुलै ते २३ जुलैंपर्यंत सर्वात मोठी युवा फुटबाल स्पर्धा होतेय. त्यात ही मुलं सहभागी होत आहेत.
कैलास पुरी, पुणे : पिंपरी चिंचवडमधल्या महानगर पालिकेच्या शाळेत शिकणारी मुलं खर तर खडतर परिस्तितीशी मुकाबला करणारी… वडील रोजंदारीवर काम करणारे... आर्थिक स्थिती बिकट… पण, असं असतानाही पिंपरी चिंचवड मधली काही मुलं आणि मुली थेट स्वीडनला निघालीत. ते ही फुटबॉल खेळायला... स्वीडनमध्ये १७ जुलै ते २३ जुलैंपर्यंत सर्वात मोठी युवा फुटबाल स्पर्धा होतेय. त्यात ही मुलं सहभागी होत आहेत.
मुलांवर 'फुटबॉल'ची झिंग
युरो चषकाचा फेवर आता उतरलाय. पण पिंपरी चिंचवडमध्ये मात्र फुटबॉलची झिंग आता पहायला मिळतेय! फुटबॉलची प्रॅक्टिस करणारी ही मुलं - मुली आहेत पिंपरी चिंचवडमधल्या महापालिका शाळेत शिकणारी... एव्हढंच नाही तर ते पिंपरी चिंचवडच्या झोपडपट्टीत रहातात... पण, या मुलांमधले काही जण मेसीलाही मागे टाकतील... तर कुणी रोनाल्डोला... या मुलांमध्ये रुनी पण आहे...
'एसकेएफ'ची मदत
पिंपरी चिंचवडच्या 'एसकेएफ' या कंपनीनं या मुलामुलींना थेट स्वीडनमध्ये खेळण्याची संधी मिळवून दिलीय. ही मुलं स्वीडनला जाणार आहेत. तिथं ती गोथिया फुटबाल स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यंदा २४ मुलं मुली या स्पर्धेत सहभागी होत आहेत, अशी माहिती 'एसकेएफ'चे व्यवस्थापकीय संचालक शिशिर जोशीपुरा यांनी दिलीय.
बेताची आर्थिक परिस्थिती
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचा आनंद आता या मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवतोय... काहींचे वडील ड्रायव्हर म्हणून काम करतात... काही शिपाई आहेत... तर काही गवंडी म्हणून काम करतात. पण, या मुलांना थेट स्वीडनला जाण्याची संधी मिळाल्यानं ही मुलं आणि त्यांचे पालक भारावून गेलेत.
आर्थिक परिस्थिती बेताची असताना एका कंपनीच्या सहकार्यामुळे या मुलांच्या पंखांना नवं बळ मिळालंय. ही मुलं काही तरी करण्याची जिद्द मनात बाळगत आहेत. म्हणूनच स्वप्नांना वास्तवात उतरवण्याच्या त्यांच्या स्वप्नांना लाख लाख शुभेच्छा...