पाईपलाईन फुटली, घर गेलं वाहून
विरार वसई महापालिकेला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पालघर जवळील धूकटण इथं फुटल्याने एक घर पूर्णपणे उध्वस्त झालंय.
विरार : विरार वसई महापालिकेला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पालघर जवळील धूकटण इथं फुटल्याने एक घर पूर्णपणे उध्वस्त झालंय.
रब्बी पिकांसह बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. घरातील रहिवाशांना जलवाहिनी फुटल्याचा लागलीच अंदाज आल्याने या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र विरार वसईला सूर्य धरणातून पाणी पुरवठा खंडित राहणार आहे.
धूकटण येथील दिवेकर पाडा इथे दत्तात्रय गणपत पाटील यांचे घर जलवाहिनीपासून सुमारे १५ ते २० फुटांवर आहे. पहाटे अडीचच्या सुमारास या जलवाहिनीच्या ठिकाणाहून अचानक मोठा आवाज आला आणि जमिनीतून पाणी बाहेर येऊ लागले. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे एका घरासह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर लाखो मोठा जलसाठा वाया गेलाय.