पिझ्झा ऑर्डर देऊन डिलिव्हरी बॉयला लुटले
पिझ्झा ऑर्डर देऊन डिलिव्हरी बॉयला लुटण्याची घटना पुण्यात घडली, मोबाईल फोनवरुन पिझ्झाची ऑर्डर
पुणे : पिझ्झा ऑर्डर देऊन डिलिव्हरी बॉयला लुटण्याची घटना पुण्यात घडली, मोबाईल फोनवरुन पिझ्झाची ऑर्डर देऊन डिलिव्हरी बॉयला लुटण्यात आलं. ही घटना मुंढव्यातील केशवनगरमध्ये शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.
चोरट्यांनी पिझ्झा डिलिव्हरी बॉयकडून ५ हजारांची रोकड आणि पिझ्झा असा एकूण ७ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहेय
खराडी येथे राहणारा दीपक कवळे या २६ वर्षीय पिझ्झाबॉयचं काम करणाऱ्या मुलाने फिर्याद दिली आहे. दीपकच्या फिर्यादीवरुन मनोज तिघाजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.