गरिबाला २०२२पर्यंत स्वत:चे घर - नरेंद्र मोदी
प्रत्येक गरिबाला २०२२पर्यंत स्वत:चे घर मिळेल, असे सांगताना ऊर्जेशिवाय विकास शक्य नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
नागपूर : प्रत्येक गरिबाला २०२२पर्यंत स्वत:चे घर मिळेल, असे सांगताना ऊर्जेशिवाय विकास शक्य नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मोदी यांनी आज दीक्षा भूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
विकासाचे कोणतेही स्वप्न हे ऊर्जेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. ऊर्जेशिवाय विकास शक्य नाही, असे मोदी यांनी सांगितले. दीक्षाभूमीनंतर मोदी यांनी कोराडीत जाऊन औष्णिक विद्यूत वीज निर्मिती प्रकल्पातीन नव्या वीज संचाचे लोकार्पण केले. त्यावेळी ते बोलत होते.
'भीम' शिकवा, १० रुपये कमवा
भीम अॅपची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यात येईल असे मोदी म्हणालेत. त्यासाठी जे लोक भीम अॅप दुसऱ्यांना शिकवतील त्यांच्या खात्यात १० रुपये जमा होतील. भीम अॅप शिकवा आणि पैसे कमवा अशी त्यांनी यावेळी ऑफरच देऊ केली. भीम अॅपमध्ये 'रेफरल' असा एक पर्याय आहे. तो वापरून तुम्ही जर एखाद्याला भीम अॅप वापरण्याची शिफारस केलीत, त्याला ते वापरायला शिकवलंत आणि त्यानंतर त्यानं जर त्यावरून तीन व्यवहार केले, तर तुमच्या खात्यात दहा रुपये जमा होतील, असे मोदी म्हणालेत.
एका दिवसात तुम्ही २० लोकांना 'भीम'शी जोडलेत तर तुम्हाला २०० रुपये मिळतील. या हिशेबाने सुट्टीच्या काळात तुम्ही इतके पैसे कमवू शकाल की तुम्हाला आई-वडिलांकडे वेगळे पैसे मागावे लागणार नाहीत, असे उत्पन्नाचं साधन मोदींनी तरुणांना दाखवून दिलेय. त्यामुळे यातून पैसे कमिवण्याबरोबर भीम अॅपचा पसार होईन कॅशलेसला प्रोत्साहन मिळणार आहे.