डोंबिवली : शहरात धूम स्टाईलनं बाईक चालवणाऱ्यांनी उच्छाद घातलाय. अनेकदा हे तरुण मद्य प्राशन करुन बाईक चालवतात. डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरीक आणि कवी दत्तात्रय धामणकर यांना अशाच एका भरधाव बाईकस्वारानं उडवलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांच्या डोक्याला आणि डोळ्याला जबर मार लागला असून त्यांना उपचारासाठी लक्ष्मी हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय. दरम्यान या बाईक स्वारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.