इस्लामपूर : सांगली जिल्ह्यातील मसूचिवाड़ी छेडछाड प्रकरणी अखेर पोलिसांनी तिघांना अटक केली. इस्लामपूर पोलिसांनी ही कारवाई केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंटी उर्फ रोहीत खओत, सागर खोत, अप्पासो बबलेश्वर यांना अटक करण्यात आलीय. तर प्रमुख आरोपी राजेंद्र पवार फरार आहे. 


मसूचीवाडीतल्या 50 ते 60  मुली या बोरगावमध्ये कॉलेजमध्ये जातात. या बोरगांवमधली काही गाव गुंड त्या मुलींची छेडछाड करायचे. या छेडछाडीमुळे या मुलींनी आपले शिक्षणच बंद केले आहे. तर काही मुली गाव गुंडांच्या दहशतीखाली शिक्षण घेतायत. 


या छेडछाडीला कंटाळून मसूचीवाड़ी ग्रामसभेने मुलींना बोरगांव मधील महाविद्यालयात शिक्षणासाठी न पाठवण्याचा आणि येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव मंजूर करुन घेतला आहे.