पोलीस मारहाण प्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल
निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसाला जमावानं बेदम मारलंय. पाथर्डीत इथं रविवारी ही घटना घडली आहे. या मारहाणीत पोलिस शिपाई महादेव शिंदे हे गंभीर जखमी झालेत. जिल्हा परिषदेच्या शाळेत अल्हनवाडी सोसायटीसाठी मतदान सुरु होतं.
अहमदनगर : निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसाला जमावानं बेदम मारलंय. पाथर्डीत इथं रविवारी ही घटना घडली आहे. या मारहाणीत पोलिस शिपाई महादेव शिंदे हे गंभीर जखमी झालेत. जिल्हा परिषदेच्या शाळेत अल्हनवाडी सोसायटीसाठी मतदान सुरु होतं.
या मदतानादरम्यान शिंदे यांनी मतदारांना रांगेत उभं राहण्यास सांगितले. याचा राग आल्यानं जमावाने शिंदेंना धक्काबुक्की केली आणि त्यानंतर बेदम मारहाण केली. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.