अहमदनगर : निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसाला जमावानं बेदम मारले. पाथर्डीत इथं रविवारी ही घटना घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मारहाणीत पोलीस शिपाई महादेव शिंदे हे गंभीर जखमी झालेत. जिल्हा परिषदेच्या शाळेत अल्हनवाडी सोसायटीसाठी मतदान सुरु होते. या मदतानादरम्यान शिंदे यांनी मतदारांना रांगेत उभं राहण्यास सांगितले.


याचा राग आल्यानं जमावाने शिंदेंना धक्काबुक्की केली आणि त्यानंतर बेदम मारहाण केली.. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र अजून कोणालाही अटक करण्यात आली नाही.