पोलिसाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी अटक
मुंबई पोलिसात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
दिंडोरी - नाशिक : मुंबई पोलिसात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. गोरख मधुकर शेखरे असं त्याचं नाव आहे.
दिंडोरी तालुक्यातील मोहाडी इथं सुट्टीसाठी गावी आला असताना त्यानं अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दिंडोरी पोलिसांत दाखल करण्यात आला होता. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने गोरखला ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.