नाशिक : आयपीएल सामन्यावर सट्टा लावणारे रॅकेट नाशिक पोलिसांनी उध्वस्त केलं आहे. नाशिकच्या वडाळा रोडवरील विधातेनगर मधल्या बंगल्यातून 8 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून, टीव्ही, 3 लॅपटॉप, 79 मोबाईल, 2 पे ड्राइव्ह असा चार लाख 22 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


अटक केलेल्यांमध्ये नागपूरचे 5, बिहारचे 2 गोंदियाचा एक अशा ८ लोकांचा समावेश आहे. मुंबईनाका पोलिसात यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलकाता आणि हैद्राबाद संघाच्या सामन्या दरम्यान अत्याधुनिक पद्धतीने हा सट्टा खेळला जात होता. पोलिसांनी हा सट्टा उध्वस्त केला आहे.