सातारा अपघातात पोलीस ठार
पुणे- बंगळुरु महामार्गावर झालेल्या विचित्र अपघातात एक पोलीस ठार झाला. लक्झरी बसने पोलीस हवालदाराला उडविल्याने मृत्यू झाला.
सातारा : पुणे- बंगळुरु महामार्गावर झालेल्या विचित्र अपघातात एक पोलीस ठार झाला. लक्झरी बसने पोलीस हवालदाराला उडविल्याने मृत्यू झाला.
भुईंज ठाण्यातील पोलीस नाईक नितिन जमदाडे (35, मूळ रा. ओझर्डे) असे मृत हवालदाराचे नाव आहे. जमदाडे ड्यूटी संपवून मध्यरात्री सातारा येथील घरी निघाले होते. रायगाव फाटा येथे अपघात झाल्याचे पाहून थांबले. कंटेनर आणि कारमध्ये झालेल्या अपघातातील वाहने बाजूला काढत वाहतूक पूर्ववत करत होते.
यावेळी पुण्याकडे निघालेल्या लक्झरी बसने त्यांना ठोकर दिली. या विचित्र अपघातात जमदाडे, वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल अमोल कांबळे आणि एक होमगार्ड असे तिघे जखमी झाले.