पोलीस उपनिरीक्षकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
उस्मानाबाद जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर एका पोलीस सब-उपनिरीक्षकानंच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलीय.
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर एका पोलीस सब-उपनिरीक्षकानंच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलीय.
या नराधमाने रिव्हॉल्व्हरची भीती दाखवून १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केलाय. यानंतर भेदरलेल्या मुलीनं ही घटना आपल्या आई-वडिलांना सांगितलं.
या प्रकरणी पोलिसांनी वेगानं हालचाली करत आरोपी प्रेम सुखदेव बनसोडे याला तत्काळ गजाआड करण्यात आलंय. मूळ उस्मानाबादचा रहिवासी असलेला बनसोडे सध्या विश्रामबाग पोलीस स्टेशला कार्यरत आहे. त्याच्यावर उस्मानाबादच्या आनंदनगर पोलीसस्टेशनमध्ये बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलीय.
रक्षकच बनतायत भक्षक?
या घटनेमुळे, राज्यात महिला सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची ज्यांच्यावर जबाबदारी तेच आता अत्याचार करत असल्याचंही धक्कादायक आहे.
पवारांनी केली चिंता व्यक्त
महाराष्ट्रात सातत्याने अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. सरकार राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राबवण्यात पूर्णतः अपयशी ठरले आहे. या घटनांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली असून सरकारच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध करण्यासाठी तसेच पीडित अल्पवयीन पीडितेच्या कुटुंबाला धीर देण्यासाठी खासदार शरद पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधिमंडळ गटनेते जयंत पाटील हे उस्मानाबाद येथे जाणार आहेत.