यवतमाळमध्ये पोलिसाची आत्महत्या
यवतमाळ जिल्ह्यात पोलीस स्टेशन मध्ये पोलीस कॉन्स्टेबलनं स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात पोलीस स्टेशन मध्ये पोलीस कॉन्स्टेबलनं स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. पुसदच्या वसंत नगर पोलीस स्टेशन मध्ये ही घटना घडली आहे.
नागोराव शिंदे असं आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचा-याचं नाव आहे. दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास शिंदे यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. पोलीस ठाण्यामध्येच त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.