ठाणे : सध्या कल्याणमध्ये अभूतपूर्व अशी पाणी टंचाईची समस्या उदभवली आहे. महापालिकेतर्फे सध्या 3 दिवस पाणीकपात लागू करण्यात आलेली आहे. मात्र त्यानंतर जे पाणी येतंय ते दूषित असून, या पाण्यात अळ्या आणि किडे आढळून आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण पश्चिम मधील अन्नपूर्णा नगर भागात मोठ्या प्रमाणात दूषित पाणी येत असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. कल्याण पूर्व भागात सुद्धा अनेक ठिकाणी दूषित पणींपुरवठा होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. 


आधारवाडी भागात मात्र हि समस्या जास्त प्रमाणात भेडसावत आहे. याबाबत स्थानिक नगरसेवकांनी तात्काळ हि समस्या दूर करून नागरीकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येईल अस आश्वासन दिलंय. मात्र एकूणच या पाणी टंचाईच्या काळात त्रासलेल्या नागरिकांना दूषित पाण्यामुळे अजून मनस्ताप सहन करावा लागतोय.