डोंबिवली : एमआयडीसी परिसरातील प्रदूषण काही अंशी कमी झालं असलं तरी आता या परिसरातील झाडांवर काळ्या चिकट पावडरचे थर रोज जमा होत आहेत. पानांचा रंग काळवंडला असून आसपासच्या कारखान्यांतून निघणाऱ्या घातक अशा काळ्या धूरामुळंच हे होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही कंपन्या या उत्पादनासाठी हलक्या प्रतीचा कोळसा किंवा चिनी बनावटीच्या कोळशाचा वापर करत असल्यामुळं हा धूर परिसरात पसरतो. त्यामुळं झाडं काळवंडली असावीत असा संशय काहींनी व्यक्त केला आहे. तर या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडं तक्रार केली असून मंडळातर्फे या भागाचं सर्वेक्षण केलं जाणार आहे.


झाडांवर साचलेली पावडर नेमकी कशाची आहे याची प्रयोग शाळेतून तपासणी करणार असल्याची माहिती प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्थनिकांना दिली आहे. मात्र केवळ पोकळ आश्वासन न देता काही ठोस उपाय करण्याची मागणी स्थानिक करत आहेत.