नाशिक : नाशिकच्या महाकवी कालिदास नाट्यगृहाची अत्यंत दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. नाट्यगृहात अक्षरशः घाणीचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे कलाकारांना इथे नाटकाचा प्रयोग करणं मुश्किल झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या नाटकाचा प्रयोग नुकताच नाशिकमध्ये झाला, पण यावेळी प्रशांत दामले यांनी नाट्यगृहाच्या दुरावस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या नाट्यगृहाच्या दयनीय अवस्थेबाबतचे काही फोटो प्रशांत दामले यांनी फेसबूकवरून शेअर करत खंत व्यक्त केली आहे.  


तुटलेल्या खुर्च्या, टॉयलेटची दुर्गंधी, मेकअप रुमची दुरवस्था आणि सोयीसुविधांचा प्रचंड अभाव यामुळे इथे नाटकाचे प्रयोग करणार तरी कसे असा संतप्त सवाल कलाकार विचारत आहेत. तर दुसरीकडे गैरसोयीमुळे प्रेक्षकही नाराज होत तीव्र संताप व्यक्त करतात. मात्र वर्षानुवर्ष तक्रारी करूनही नाशिक महानगरपालिकेच्या ढिम्म प्रशासनाला आणि पदाधिका-यांना अजूनही जाग येत नाही.