नागपूर : सुमारे अडीच वर्षाच्या कालावधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. सुमारे साडे तीन तासाच्या या दौऱ्या दरम्यान पंतप्रधान दीक्षाभूमीसह तीन ठिकाणी जाणार असून शहरातील माणकापूर क्रीडा संकुल येथील डीजी-धन सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दरम्यान अनेक मोठ्या संस्थांचे भूमिपूजन होणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षाभूमी येथील अस्थी कलशाचे दर्शन घेत मोदी आपल्या दौऱ्याची सुरवात करणार आहेत. यांनतर १२.४५ वाजता कोराडी येथील औष्णिक ऊर्जा संचांचे उदघाटन आणि सरतेशेवटी १.१० वाजता मानकापूरच्या क्रीडा संकुल येथे भूमिपूजन तसेच डीजी धन मेळाव्याला ते हजेरी लावणार आहेत. 


येथेच IIIT, IIM, AIIMS सारखया संस्थांचे भूमिपूजन पंतप्रधान करणार आहेत. कॅशलेस अर्थ व्यवस्थेकडे वाटचाल करताना देशातील विवीध शहरात डीजी धन मेळावे आयोजित झाले असून त्यातील नागपूरचा हा मेळावा शंभरावा आणि शेवटचा असेल.