कैद्याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी ५ पोलिस निलंबित
औरंगाबादमध्ये एका कैद्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी ५ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. आरोपीला तपासासाठी नेत असतांना आरोपीने गाडीतून उडी घेतली.
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एका कैद्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी ५ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. आरोपीला तपासासाठी नेत असतांना आरोपीने गाडीतून उडी घेतली.
या दरम्यान कैद्याचा मृत्यू झालाय असा दावा पोलिसांनी केलाय. कैद्याच्या कुटूंबानी या अपघातानंतर घातपाताचा संशय व्यक्त केलाय.कुटुंबाच्या आरोपानंतर आणि घटनेचे गांभीर्य ओळखून या प्रकरणी पाच पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.
कैदी राहूल गायकवाड याला मोटारसायकल चोरीप्रकरणी अटक करण्यात आली होती. राहूलचा मृत्यू हा गाडीतून उडी मारल्याने नाही तर मारहाणीत मुलाचा मुत्यू झालाचा कुटूंबियानी आरोप केला आहे.