नाशिक : झी 24 तासाच्या बातमीनंतर नाशिक तुरुंगातलं मोबाईल नेटवर्क आता उद्ध्वस्त झालं आहे. पण या कारवाईनं आता कैदी पिसाटल्याचं चित्र दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोबाईल शोध घेणाऱ्या कारगृहातल्या अधिकाऱ्यालाच कैद्यांनी मारहाण केली आहे. अधिकाऱ्याला मारहण केल्याचा गुन्हा नाशिकरोड पोलिसामध्ये दाखल करण्यात आला आहे. तुरुंगातला कायदा सुव्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आतापर्यंत तुरुंगातून ४० मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तर तीन अधिकाऱ्यांना या प्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे.


नाशिक मध्यवर्ती कारागृहात सुरु असलेल्या मोबाईल कारभाराची पोलखोल केल्यानंतर स्वतः तुरुंग महानिरीक्षकांनी रविवारी परिसराला भेट दिली. तटबंदीची पाहणी करत त्यांनी नाशिक शहर पोलिसांसोबत चर्चा केली.