पुणे : अकरावी ऑनलाईन अॅडमिशनच्या प्रक्रियेत ज्या विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेश मिळालेले नाहीत अशा विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी मंगळवारी पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर घेराव आंदोलन केलं.


विशेष फेरीचं वेळापत्रक लवकरात लवकर जाहिर करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच राज्यभरात सुरु झालेली अकरावीची कॉलेज तातडीनं बंद करा आणि राज्यभरात प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळाल्यावरच कॉलेजेसचं कामकाज सुरु करा अशी मागणी करत विद्यार्थी आणि पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली.