कल्याणमध्ये वर्दीवरच जीवेघणा हल्ला, हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा
ट्रॅफिक कॉन्स्टेबल विलास शिंदेंच्या मृत्यूनंतर उठलेलं वादळ शमण्याआधीच कल्याणमध्ये पुन्हा एकदा वर्दीवरच जीवेघणा हल्ला झालाय. काल रात्री तिसगाव नाका परिसरात पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांना पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. गणेश विसर्जनाच्या वेळी हा धक्कादायक प्रकार घडला.
कल्याण : ट्रॅफिक कॉन्स्टेबल विलास शिंदेंच्या मृत्यूनंतर उठलेलं वादळ शमण्याआधीच कल्याणमध्ये पुन्हा एकदा वर्दीवरच जीवेघणा हल्ला झालाय. काल रात्री तिसगाव नाका परिसरात पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांना पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. गणेश विसर्जनाच्या वेळी हा धक्कादायक प्रकार घडला.
गणेश विसर्जन करताना वेळकाढूपणा करणा-या कार्यकर्त्यांना डगळे यांनी हटकलं. याचाच राग येऊन संतप्त कार्यकर्त्यांनी डगळेंनाच तलावात बुडवण्याचा प्रयत्न केला. गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांची ही मुजोरी कॅमे-यात कैद झाली आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसावर झालेल्या या हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याणमध्ये मोर्चा निघाला आहे. पोलिसांचे कुटुंबीय आणि कल्याणकर या मोर्चात सहभागी झाले आहेत.