अन्नदात्या शेतक-यांसाठी अन्नत्याग आंदोलन
अन्नदात्या शेतक-यांसाठी ठिकठिकाणी अन्नत्याग आंदोलन करण्यात येतंय. सामाजिक संघटनांनी गावोगावी आंदोलनात सहभाग घेतला. किसानपुत्र आंदोलनाचे कार्यकर्ते अमर हबीब, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांसह शेतक-यांवर प्रेम करणा-या अनेकांनी उपवास करून शेतक-यांप्रती सहवेदना व्यक्त केल्या.
यवतमाळ : अन्नदात्या शेतक-यांसाठी ठिकठिकाणी अन्नत्याग आंदोलन करण्यात येतंय. सामाजिक संघटनांनी गावोगावी आंदोलनात सहभाग घेतला. किसानपुत्र आंदोलनाचे कार्यकर्ते अमर हबीब, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांसह शेतक-यांवर प्रेम करणा-या अनेकांनी उपवास करून शेतक-यांप्रती सहवेदना व्यक्त केल्या.
१९ मार्च 1986 मध्ये यवतमाळच्या महागाव तालुक्यातील चिलगव्हाणमधील भूमिपुत्र साहेबराव करपे पाटील यांनी कर्ज आणि नापिकीमुळे पत्नीसह आत्महत्या केली होती. अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून सोडणारी ही पहिली शेतकरी आत्महत्या ठरली. गावात समस्त ग्रामस्थांनी श्रद्धांजली सभा आयोजित करून शेतक-यांच्या समस्या मांडल्या. चिलगव्हाणमध्ये महिलांनी घरापुढे काळया ठिपक्यांची रांगोळी काढून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला सोबतच प्रत्येक घरात चुलबंद ठेऊन अन्नत्याग केला.
पाहा व्हिडिओ