नवी दिल्ली : पुणे आकाशवाणीच्या सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या बातम्या बंद होणार नाहीत अशी ग्वाही मनुष्यबळ विकास मंत्री आणि पुण्याचे राज्यसभा खासदार प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन दिवसांपूर्वी पुण्यातल्या आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद करण्यासंदर्भातल्या आदेश काढण्यात आले होते. पुण्यातल्य आकाशवाणीतील वृत्तसंपादक आणि संपादक यांची बदली करून त्यांना राज्याबाहेर काढण्यात आलं होते.