पुणे : "पुणे व चिन्हुआ ही दोन्ही शहरे ऐतिहासिक असून या दोन्ही शहरात मैत्री कराराबरोबर पर्यटन विकास व्हावा" अशी अपेक्षा चीनमधील चिन्हुआ शहराच्या पर्यटन विभागाच्या उपसंचालिका चौव हुवा, यांनी पुण्यात आज सोमवारी व्यक्त केली. प्रवासी भारतीय दिनानिमित्त  पुण्यात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी चिन्हुआ पर्यटन विभागाच्या शिष्टमंडळाला पुण्यात आमंत्रित करण्यात आले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे आणि चीन या दोन देशात सांस्कृतिक साम्य आहे. तसेच दोन्ही देशात व्यापारी संबंधही वाढत आहेत. दोन्ही देशात पर्यटन विकास व्हावा या उद्देशाने हे शिष्टमंडळ भारतभेटीवर आहे.


चिन्हुआ महानगरपालिका 90 ऐतिहासिक गावे विकसित करत आहेत.  या गावांमधे चिनी ग्रामीण संस्कृतीचा अनुभव पर्यटकांना घेता येईल. भारतीय व चिनी ग्रामीण संस्कृतींमध्ये देवाणघेवाण व्हावी अशी अपेशा या शिष्टमंडळाने व्यक्त केली. भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी चीन सरकारने विशेष योजना तयार करण्यात आल्याची माहिती या शिष्टमंडळाने दिली. चिन्हुआतील सफिंग गावात भारतीय संस्कृती दर्शविणारे एक संग्रहालय तयार करण्यात येत असून त्याची निर्मितीची जबाबदारी पुण्यातील वास्तुविशारद चंदा कानेटकर यांच्याकडे देण्यात आली आहे. असेच एखादे चिनी संग्रहालय पुण्यात व्हावे अशी आशा उपसंचालिका चौव हुवा यांनी व्यक्त केली. 


या कार्यक्रमाचे संयोजन पर्यटन व्यावसायिक निलेश भन्साळी व चिनी भाषेच्या अभ्यासक श्रद्धा वार्डे यांनी केले होते. यावेळी चिनी भाषेच्या प्रशिक्षक यशोधरा गाडगीळ यांनी दुभाषी म्हणून काम केले. हे शिष्टमंडळ पुणे शहराबरोबरच जयपूर व दिल्ली या दोन्ही शहरांना भेट देणार आहेत.