समृद्ध जीवनच्या कार्यालवर हल्लाबोल
समृद्ध जीवनच्या जवळपास हजाराहून अधिक कर्मचा-यांचे कित्येक महिन्यांचे वेतन या कंपनीने दिले नाही. त्याचबरोबर नोकरी सोडलेल्या अनेक नोकरदारांचा पीएफ देण्यासाठीही संस्थेकडून चालढकल होत असल्याचा आरोप या नोकरदारांनी केला आहे.
पुणे : समृद्ध जीवनच्या जवळपास हजाराहून अधिक कर्मचा-यांचे कित्येक महिन्यांचे वेतन या कंपनीने दिले नाही. त्याचबरोबर नोकरी सोडलेल्या अनेक नोकरदारांचा पीएफ देण्यासाठीही संस्थेकडून चालढकल होत असल्याचा आरोप या नोकरदारांनी केला आहे.
अनेक महिने चकरा मारुनही ठेवीदारांना आश्वासनाशिवाय काहीही मिळालेलं नाही. कोट्यवधी रुपये खर्च करुन आयडियल कमर्शियल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी ही कंपनी विकत घेणा-या समृद्ध जीवननं आधी आमचे पैसे द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.