पुणे : मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर मध्यरात्री कार कंटेनरला मागून धडकून झालेल्या भीषण अपघातात मुंबईतील ४ जण जागीच ठार झाले. लोणावळा येथील वलवण महाविद्यालयाजवळ रात्री १ च्या सुमारास हा अपघात झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृतांमध्ये मुंबई पोलीस कर्मचारी राजेंद्र विष्णू चव्हाण यांचा आणि त्यांची पत्नी वनीता, शंकर मारुती वेणगुळे, पुजा वेणगुळे (सर्व राहणार मुंबई) यांचा समावेश आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा  अपघात झाला. 


पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी सेंट्रो कार मागून कंटेनरला धडकली. ही धडक एवढी भीषण होती की सेंट्रो गाडी कंटेनरच्या ४ फूट खाली घुसल्याने  आतमध्ये बसलेल्या चारही जणांचा गाडीतच मृत्यू झाला, अशी माहिती लोणावळा पोलिसांनी दिली.