पुणे : पुण्यात रेसिंगचा नाद एका तरूणीच्या जीवावर बेतला रेसिंगच्या नादात कृतिका नांदलस्कर या तरुणीचा जागीच मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यरात्रीपूर्वी पार्टी आणि नंतर कार रेसिंगच्या नादानं कृतिका नांदलस्कर आपल्या सात मित्रांसह लाँग ड्राईव्हला निघाली. आंबेगावात शुक्रवारी ही पार्टी होती ती संपवून ते पुण्याच्या दिशेने निघाले.


दोन्ही आय ट्वेंटी कार हाय वेवर निघाल्या. काही मिनिटात रेसिंगचं भूत डोक्यात गेलं आणि वेगानं घात केला.


आय ट्वेंटी कारच्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला, तर काही जखमी झाले. कारचा वेग एवढा होता की बॅरिकेट्सही तुटले. कारकडे पाहिलं तरी या अपघाताची तीव्रता सहज लक्षात येईल.


मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताची मालिका सुरु आहे. त्यात आणखी एका अपघाती मृत्यूची भर पडली आहे. दोन्ही कार चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.