पुणे :  पुण्यातले मनसे नगरसेवक रवींद्र धंगेकर आज काँग्रेसमधे प्रवेश करणार आहेत. मुंबईत काँग्रेस पक्षाच्या पार्लमेंटरी पक्षाच्या बैठकीनंतर धंगेकर पक्षात प्रवेश केला आहे. मनसेकडून विधानसभा निवडणूक लढवलेले धंगेकर, भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेले कित्येक दिवस सुरु होती.  मनसेकडून विधानसभा निवडणूक लढवलेले धंगेकर, भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेले कित्येक दिवस सुरु होती. 


मात्र पुण्याचे पालकमंत्री गिरिश बापट  आणि भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांचा त्यांना विरोध होता. त्यामुळेच धंगेकरांचा भाजप प्रवेश लटकला होता. या दरम्यान दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी धंगेकरांची अवस्था झाली होती. या पार्श्वभूमिवर धंगेकर आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार का याबाबत उत्सुकता आहेत.