रेशनिंग दुकानदाराला तात्काळ अटक, वर्षभरासाठी स्थानबद्ध
रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार करणाऱ्या दुकानदाराला अटक करून वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्यात आल्याची कारवाई पुणे पोलिसांनी केलीय.
पुणे : रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार करणाऱ्या दुकानदाराला अटक करून वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्यात आल्याची कारवाई पुणे पोलिसांनी केलीय.
अत्यावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा केल्यानंतर एमपीडीए म्हणजेच महाराष्ट्र प्रिव्हेंसिव्ह डेंजरस एक्टिव्हीटी कायद्याखाली करण्यात आलेली ही राज्यातील पहिलीच कारवाई आहे.
गोकुळ साबळे असं कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
तो हडपसर परिसरातील राहणार असून धान्याचा काळा बाजार केल्या प्रकरणी त्याच्या विरुद्ध निगडी, खडक तसेच कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.