पुणे : पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्याला अभिमान वाटायला लावणारी अशी एक बातमी आता पाहूया. देशभरातल्या सर्वात स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत, पुणे रेल्वे स्थानकानं नववा क्रमांक पटकावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातल्या एकंदर 407 रेल्वे स्थानकांवरच्या स्वच्छतेचं, क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडियानं सर्वेक्षण केलं. त्यात आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम रेल्वे स्थानकानं पहिला क्रमांक मिळवला. 


विशेष म्हणजे यामध्ये पहिल्या दहा स्वच्छ रेल्वे स्थानकांत, महाराष्ट्रातून एकटं पुणे रेल्वे स्थानकच निवडलं गेलं आहे. त्यामुळे ही बाब गौरवाची असली तरीही विचार करायला लावणारीही आहे.