पुण्याच्या धरण क्षेत्रात दमदार पाऊस
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात शनिवारी मध्यरात्री चांगला पाऊस पडला. यामुळे पाणीसाठ्यात थोडी वाढ झाली आहे.
पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात शनिवारी मध्यरात्री चांगला पाऊस पडला. यामुळे पाणीसाठ्यात थोडी वाढ झाली आहे.
पुणे शहर आणि उपनगरात शनिवारी रात्री १० वाजता किरकोळ पाऊस सुरवात झाली होती. मात्र १ वाजल्यानंतर जोरदार पाऊस झाला.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाला. शहरात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता.
रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत पडलेला पाऊस
खडकवासला 14 मिलिमीटर
पानशेत 14 मिलिमीटर
वरसगाव 13 मिलिमीटर
टेमघर 19 मिलिमीटर