पुणे :  वारजे गावात प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली. आज झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात  सुमो आणि जळगावचा मल्ल सामना असा रंगला. सचिन दोडके क्रीडा प्रतिष्ठान वतीने आयोजित या स्पर्धेचं उदघाटन, तुझ्यात जीव रंगला मालिकेतला नायक हार्दिक जोशी याच्या हस्ते झाले.


या स्पर्धेसाठी गादी आणि मातीचे आखाडे तयार करण्यात आलेत. यंदा पुन्हा साऱ्यांच्या नजरा चाळीसगावचा डबल महाराष्ट्र केसरी विजेता विजय चौधरी याच्याकडे असणार आहेत. 2014 आणि 2015 अशा दोन सलग वर्षात विजय चौधरीनं मानाची गदा पटकावत महाराष्ट्र केसरीचा किताब आपल्या नावावर केलाय. त्यामुळे विजय चौधरी यंदा महाराष्ट्र केसरीची हॅटट्रिक साजरी करणार का याची उत्सुकता आहे.