दोन आमदारांच्या सूनबाई जोरात, जिल्हा परिषद निवडणुकीची चर्चा
सर्वत्र निवडणुकीची धामधुम सुरु असतानाच इंदापूर तालुक्यात मात्र दोन माजी आमदारांच्या सूनबाईंची जोरात चर्चा सुरु आहे.
पुणे : सर्वत्र निवडणुकीची धामधुम सुरु असतानाच इंदापूर तालुक्यात मात्र दोन माजी आमदारांच्या सूनबाईंची जोरात चर्चा सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी वालंचदनगर कळस गटातून दोन माजी आमदारांच्या सुना एकमेकांविरूध्द निवडणूक लढवित आहेत.
यामध्ये इंदापूरचे माजी आमदार स्वर्गीय राजेंद्रकुमार घोलप हे १९८० ते १९८५ पाच वर्षे तालुक्याचे आमदार राहिले होते. यांच्या सुनबाई वदनादेवी अविनाश घोलप या पहिल्यांदाच जिल्हा परिषद पंचवार्षिक निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्या विरोधात तालुक्याचे १९८५ ते १९९५ दहा वर्षे तालुक्याचे आमदार म्हणून राहिलेल्या माजी आमदार स्वर्गीय गणपतराव पाटील यांच्या सूनबाई वैशालीताई प्रतापराव पाटील या निवडणूक रिंगणात आहेत.
दोन्हीही सुनबाईंनी या गटात जाऊन मतदारांच्या घराघरात जाऊन भेटीगाठीवर भर दिलाय. आपल्यालाच मत द्या, असे आवाहन करत जोरदार प्रचार सुरु केला आहे. दोंघीनी ही निवडणूक आपणच जिंकणार असा दावा केला आहे.