हिंगोलीत अजूनही तूर खरेदीचा मूहूर्त नाही
हिंगोलीत तूर खरेदीचा मूहूर्त अजूनही सापडलेला नाही. जिल्ह्यात तूरीचे पंचनामे होऊनही जिल्ह्यात तूर खरेदीला सुरुवात झालेली नाही. 22 तारखेपूर्वी नाफेडच्या 3 सेंटरवर आणि 6 खाजगी सेंटरवर 89 हजार 420 क्विंटल येवढी तूर खरेदी झालेली आहे.
हिंगोली : हिंगोलीत तूर खरेदीचा मूहूर्त अजूनही सापडलेला नाही. जिल्ह्यात तूरीचे पंचनामे होऊनही जिल्ह्यात तूर खरेदीला सुरुवात झालेली नाही. 22 तारखेपूर्वी नाफेडच्या 3 सेंटरवर आणि 6 खाजगी सेंटरवर 89 हजार 420 क्विंटल येवढी तूर खरेदी झालेली आहे.
नाफेडच्या केंद्रावर 7348 क्विंटल तूर 22 तारखे पर्यंतची शिल्लक आहे. तर 30 हजार क्विंटलपेक्षा जास्त तूर 22 तारखेनंतरची सेंटरवर पडून आहे. तीन दिवसांच्या सुट्ट्या रद्द झाल्यात. असं असलं तरी जिल्हाधिका-यांच्या अनुमतीचे पत्र गठीत केलेल्या समितीला मिळाले नसल्याने तूर खरेदी होणार नसल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी स्पष्ट केलं आहे. 22 तारखेपूर्वीची तूर खरेदी रविवारपासून सुरु होईल असंही त्यांनी सांगितलं आहे.