दारुची दुकानं वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांची धरपड?
अकोला महापालिकेच्या शेवटच्या सभेत जोरदार गदारोळ झालाय.
अकोला : अकोला महापालिकेच्या शेवटच्या सभेत जोरदार गदारोळ झालाय.
राष्ट्रीय अन राज्य महामार्गांचं महापालिकडे हस्तांतरणाच्या ठरावावरून सर्वसाधारण सभेत तोडफोड करण्यात आलीय. विरोधी काँग्रेस-भारिप बहुजन महासंघाच्या नगरसेवकांकडून ही तोडफोड करण्यात आलीय. यावेळी डायस आणि माईकची तोडफो़ड करण्यात आलीय.
अकोला शहरातून सुरत-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा गेलाय. या महामार्गाच्या दुरूस्ती अन देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महापालिकेकडे हस्तांतरीत करण्याचा ठराव सत्ताधाऱ्यांकडून मांडण्यात आलाय.
मात्र, महामार्गालगतच्या बार आणि दारूची दुकानं बंद करण्याच्या निर्णय सरकारकडून घेण्यात आलाय. या निर्णयातून शहरातील महामार्गालगतची बार आणि दारूची दुकानं वाचविण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हा ठराव आणल्याचा आरोप करीत विरोधकांनी गोंधळ घातलाय. याच गोंधळात सभागृहातील डायस आणि माईकची तोडफोड करण्यात आलीय.