पुणे : पुणे महापालिकेच्या सभेत मनसे विरुध्द भाजप असा सामना रंगला. मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी कामगाराला दमदाटी केल्याच्या प्रकरणाचे पडसाद आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापालिकेत बिगारी म्हणून कामाला असलेल्या राजेंद्र गोगावले यांच्या तक्रारीवरून धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र हा गुन्हा एका भाजप नेत्याच्या सांगण्यावरून तसेच राजकीय आकसातून दाखल करण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे.


भाजप-मनसे नगरसेवकांच्या आरोप प्रत्यारोपामुळे महापालिका सभागृहातील कामकाजात गोंधळ झाला. मनसेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे मनसेनेने कामकाजात गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावेळी दोन्ही पक्षांनी आरोप-प्रत्यारोप केलेत.