अहमदनगर : राज्यभरात होत असलेल्या मराठा मोर्च्यांचे राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी समर्थन केले आहे. २३ तारखेला अहमदनगरमध्ये होणाऱ्या विराट मोर्चातही सहभागी होणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
 
मराठा क्रांती मुक मोर्चाला माझा पाठींबा आहे. कर्तव्य म्हणून मी मोर्चात सहभागी होणार आहे. हा मोर्चा कोणाच्याही विरोधात नाही मात्र एखाद्या विशिष्ट समाजाला पुढे करून काही मंडळी राजकारण करून विरोधात मोर्चे काढु पहातायत. दलित नेत्यांनीही लक्षात घ्यावं अस विखे पाटील म्हणालेत. दलित संघटनांनी ही मराठा मोर्चाला पाठींबा द्यायला हवा 
प्रकाश आंबेडकरांनी मांडलेल्या भूमिकेशी मी सहमत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोपर्डी घटनेचा निषेध म्हणून राज्यात लाखोंच्या संख्येने निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यानिमित्तानं अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याची आग्रही मागणी केली जातेय. पण दलित समाजाचा त्याला विरोध असून, मराठा मोर्चांना प्रत्युत्तर म्हणून प्रतिमोर्चे काढण्याची प्राथमिक तयारी सुरू झाली आहे. यातून मराठा विरूद्ध दलित असा संघर्ष चिघळू नये यासाठी दलित समाजातील काही नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली.


दरम्यान, मराठा आणि दलित समाजात तेढ निर्माण करण्यामागे भाजप आणि संघाचा प्रयत्न असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. भाजपने मात्र हा आरोप फेटाळून लावला.