राहुल गांधी कोर्टात हजर, पुढील सुनावणी ३ मार्चला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी प्रकरणी भिवंडी कोर्टात सुरु असलेल्या सुनावणीसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी कोर्टात हजर झाले.
भिवंडी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी प्रकरणी भिवंडी कोर्टात सुरु असलेल्या सुनावणीसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी कोर्टात हजर झाले.
या प्रकरणी पुढील सुनावणी आता 3 मार्चला होणार आहे. राहुल गांधींच्या वकीलांनी विनंती केल्यानं पुढील तारीख दिल्याचं याचिकाकर्त्यांनी सांगितलं.
राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात होता असं विधान राहुल गांधींनी केलं होतं. त्यावर संघाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधीं विरोधात मानहानीचा दावा दाखल केलाय.